खेडच्या जगबुडी नदीतील क्राेकाेडाईल पार्कची केवळ घाेषणा, चार वर्ष उलटूनही प्रतिक्षा


निसर्गाने वरदहस्त ठेवलेल्या काेकणाच्या किनाèयावर दरवर्षी लाखाे पर्यटक गर्दी करतात. समुद्र, धबधबे, डाेंगर, नदी, जैवविविधतेने नटलेला परिसर सगळं काही असताना काेकणात अजूनही सुट्टीचा अनुभव अधिक समृद्ध करणारे बहुआयामी पर्यटन स्थळाची कमतरता जाणवत हाेती. त्यात भर घालणारा एक अनाेखा उपक्रम खेड तालुक्यातील जगबुडी नदीकिनारी आकार घेत हाेता क्राेकाेडाईल पार्क, पण दुर्दैवाने गेली चार वर्षे हा प्रकल्प प्रत्यक्षात एक इंचही पुढे सरकलेला नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या जगबुडी नदीत अनेक वर्षांपासून माेठ्या आकाराच्या, महाकाय मगरी वास्तव्य करत आहेत. स्थानिकांना या मगरींना पाहण्याचा अनुभव नवीन नाही, मात्र या नैसर्गिक संपत्तीचा पर्यटनविकासासाठी उपयाेग व्हावा यासाठी नागरिक आणि प्राणीप्रेमींची अनेक वर्षांपासून मागणी हाेती. खेड-दापाेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री याेगेश कदम यांनी या मागणीला बांधील राहून क्राेकाेडाईल पार्कचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. शिवसेना नेते रामदास कदम आणि नामदार याेगेश कदम यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर यास प्रकल्पाला राज्य सरकारची 9 काेटी रुपयांची मंजुरी मिळाली.
शासनाच्या संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाèयांनी खेडमध्ये येऊन जगबुडी नदीची प्रत्यक्ष पाहाणी केली. पूर्ण अभ्यासानंतर पार्कचा आराखडा तयार करण्यात आला. याेग्य जागा, सुरक्षाव्यवस्था, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा या सर्वांचा तपशीलवार अहवालही तयार करण्यात आला. यामुळे खेड तालुका आणि काेकणातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले हाेते.. काेकणातील हे पहिलेच क्राेकाेडाईल पार्क ठरणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे नाव पर्यटननकाशावर उठून दिसेल अशी आशा निर्माण झाली हाेती. मात्र या सर्व प्रक्रियेनंतरही गेल्या चार वर्षांपासून प्रकल्प पूर्णपणे ठप्प आहे. निधी मंजूर असूनही बनम सुरू न झाल्याने स्थानिकांच्या नाराजीचे स्वर अधिक तीव्र हाेत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button