
तर मुस्लीम व्यापाऱ्यांना महाराष्ट्रात कोठेही दुकाने लावू देणार नाही, नितेश राणे यांचा इशारा.
हिंदू धर्माला जर आव्हान देण्याचे काम केले तर मढी गावाने जसा मुस्लीम व्यापाऱ्यांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय घेतलाय तो निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, असा इशाराही नीतेश राणे यांनी दिला.मढी गावात हिंदू धर्म सभेत ते बोलत होते. जत्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता. त्यासंदर्भात एक ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्याला गट विकास अधिकारी (बीडीओ) यांनी रद्द केला.
ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. गटविकास अधिकार्यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर, पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी वरिष्ठांना चौकशी अहवाल पाठवला असून मुस्लीम व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
मत्स्य व बंदर मंत्री नीतेश राणे सभेत बोलताना मढी ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे समर्थन करून म्हणाले, मढी गावाने घेतलेला निर्णय इतिहासात लिहिला जाईल. या गावाने जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम केले.नीतेश राणे म्हणाले, मढी गावाने घेतलेला निर्णय इतिहासात लिहिला जाईल, जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम मढी गावाने केले. मढी गावातील कडवट विचाराचे हिंदू जागृत झाले. देशाला दिशा देणारा मढी गावाचा निर्णय आहे