
कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्सप्रेसमधून महिला प्रवाशाचे हजारोंचे दागिने लंपास.
मांडवी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या एका प्रवासी महिलेच्या गळ्यातील ६० हजार ४०० रुपये किंमतीचे दागिने अनोळखी व्यक्तीनी लंपास केले. या प्रकरणी दोन अनोळखी महिलांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत निशांत अलिमुद्दीन कादिरी (३७, रा. राजीवडा रत्नागिरी) यांनी तक्रार नोंदवली आहे. त्या २३ फेब्रुवारी रोजी १०१४ क्रमांकाच्या मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या.
एक्सप्रेस खेड स्थानकात उभी असताना दोन अनोळखी महिलांनी फिर्यादी यांच्याशी संगनमताने भांडण करत त्यांना हाताची थापट मारली. या दरम्यान, फिर्यादीच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे १८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व शोल्डर पर्समधील १० हजार रुपये असा ६० हजार ४०० रुपयांच्या ऐवजासह पोबारा केला.www.konkantoday.com