
रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणे हद्दी मधून नागरिकांचे गहाळ झालेले ७५ मोबाईल त्यांच्या मुळ मालकांना परत देण्यात येणार.
रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणे हद्दी मधून नागरिकांचे गहाळ झालेले विविध मोबाईल त्यांचे मूळ मालकांना, *दि. 06/03/2025 रोजी सकाळी १०.०० वा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे (भा.पो. से.) यांच्या शुभ हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे परत देण्याचा कार्यक्रम* आयोजित करण्यात आलेला आहे.
या प्रसंगी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड व पोलीस अधिकारी/ अंमलदार उपस्थित असणार आहेत तसेच *एकूण ७५ मोबाईल त्यांच्या मुळ मालकांना परत देण्यात येणार आहेत.*तरी, कृपया आपण सर्वांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नगिरी येथे उपस्थित रहावे ही विनंती.*धनंजय कुलकर्णी (भा.पो.से.)**पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.*