
संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणात १० टक्केच पाणीसाठा
संगमेश्वर तालुक्यातील तेलीवाडी तलावात भगदाड पडल्याने गेली २ वर्ष उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेवर अवलंबून असणार्या दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहेगतवर्षी पुणे येथील ४ वरिष्ठ वैज्ञानिकांच्या पथकाने या धरणाची पाहणी केली असता या धरणाला भले मोठे भगदाड पडल्याचे दिसले होते. त्यामुळे या धरणात पाणीसाठा करणे धोक्याचे असल्याचे स्पष्ट मत त्या पथकाने सांगिल्याने चालूवर्षी ५० टक्के पाणीसाठा कमी करण्यात आला होता.
या प्रादेशिक योजनेवर दहा गावे अवलंबून असून अजून मार्च महिना आला नाही तोपर्यंत या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याच्या कारणास्तव ग्रामस्थांना कोणतीही कल्पना न देता अचानक मंगळवारपासून एक दिवसाआड पाणी सोडत असल्याने येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल झाले आहेत.www.konkantoday.com




