
शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक
. ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटात चलबिचल झाली आहे. पक्षाची बांधणी करण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने आज मातोश्रीवर आपल्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत ऑपरेशन टायगर रोखण्यासह राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली .
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पक्षातून होत असलेले आउटगोईंग थांबवणे, संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमदारांसोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. बैठकीत विधानसभा विरोधी पक्ष नेत्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाली. त्याशिवाय, या आमदारांच्या बैठकीत येणाऱ्या अधिवेशनात कोणते विषय आमदारांनी मांडायचे? सरकारसमोर राज्यातील सामान्यांचे, शिवाय गाजत असलेले विषय मांडून घेरण्यासाठीची रणनीती या आमदारांच्या बैठकीत ठरवली जाणार आहेत.विरोधी बाकांवर शिवसेना ठाकरे गटाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव,आदित्य ठाकरे,आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेता बाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्ष नेत्या संदर्भात नाव या अधिवेशनात दिले जाणार आहे. हिवाळी अधिवेशन उलटून सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात निर्णय झाला नाही. ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीत विरोधीपक्षनेते पदासाठी कोणाच नावं अंतिम करायचा? यावर आमदारांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.