
मुंबई-गोवा महामार्गावर जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील महिलेचा.
मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे सोमवारी रात्री जळालेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश मिळत आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यातील बेपत्ता झालेल्या महिलेचे दागिने व मृतदेहाजळ सापडलेल्या बांगड्या जळालेले दागिने व पैंजणीवरून ही महिला तीच असू शकते, अशी शक्यता तिच्या मुलीने व्यक्त केली.
दरम्यान मुलीचे डीएनए सॅम्पल तातडीने तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांची तीन पथके संशयिताचा शोध घेत असून यातील संशयितही निष्पन्न झाला आहे. लवकरच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतील, असे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. सोमवारी उत्तररात्री १२.१५ च्या सुमारास महामार्गावर ओरसगाव येथे महिलेचा मृतदेह जळत असल्याचे दिसून आले होते.www.konkantoday.com