
माजी खासदार विनायक राऊत यांच्या इशार्यानंतर, रेल्वे प्रशासनानं अखेर दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मध्य रेल्वेनं बंद केलेल्या दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. शिमगा सणाच्या तोंडावर या ट्रेन पुन्हा सुरू करण्याच्या रेल्वेच्या निर्णयामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे.१ मार्चपर्यंत गाड्या सुरू न झाल्यास दादर स्टेशनवर ‘रेल रोको’ आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला होता.विनायक राऊत यांच्या इशार्यानंतर, रेल्वे प्रशासनानं अखेर दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.शिमगा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे आणि या पार्श्वभूमीवर दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयामुळं कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळला आहे.
शिमगा हा कोकणातील सर्वांत मोठ्या सणांपैकी एक असून, या काळात गावाकडील लोक मोठ्या संख्येनं मुंबई आणि अन्य ठिकाणांहून कोकणात गावी येत असतात.कोरोना काळात या पॅसेंजर गाड्या बंद झाल्यानंतर त्या अद्याप सुरू झाल्या नव्हत्या. गेल्या काही वर्षांपासून या गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतूक, एसटी बस किंवा अन्य महागड्या पर्यायांवर अवलंबून राहावं लागत होतं.दरम्यान, रेल्वे प्रशासनानं या गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आता सुटकेचा निःश्वास टाकता येईल.