
भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध होत असल्यानं विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून भास्कर जाधव यांच्या निवड करण्यात येऊन नये अशी मागणी ठाकरे गटातील आमदारांनी केलीय.भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध होत असल्यानं विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्षनेते करावं असं ठाकरे गटातील काही आमदारांचे मत आहे.मागील काही दिवसांपासून आमदार भास्कर जाधव यांनी पक्षविरोधी वक्तव्य केली होती. या विधानामुळेच त्यांना विरोध केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान ठाकरेंची शिवसेना लवकरच विरोधी पक्षनेते पदाचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहे. मातोश्री या निवासस्थानी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पक्षाशी रणनीती आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाली, त्यात भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध करण्यात आला.या बैठकीत काही आमदारांनी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात यावी अशी मागणी केली. त्यामुळेच आता आदित्य ठाकरे यांच्या रुपाने एक तरुण विरोधी पक्ष नेता राज्याला मिळू शकतो. तरुण विरोधी पक्षनेता मिळाल्यास त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असंही काही आमदार म्हणालेत.