देवरूख एसटी आगारात मद्यधुंद अवस्थेतील एसटी चालकाचे अधिकार्‍यांशी गैरवर्तन, गुन्हा दाखल.

देवरूख एसटी आगार समस्यांच्या गर्तेत असतानाच गुरूवारी चालक तथा वाहक म्हणून कार्यरत असलेल्या संतोष राठोड याने मद्यधुंद अवस्थेत अधिकारी वर्गाशी अर्वाच्च भाषेत वर्तन केल. दारूच्या नशेत त्याने ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी राठोड याच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत देवरूख पोलीस ठाण्यात वाहतूक निरीक्षक कैलास साबळे यांनी फिर्याद दिली.

देवरूख एसटी आगारात संतोष राठोड चालक तथा वाहक म्हणून कार्यरत आहे. राठोड चालक तथा वाहक म्हणून कार्यरत आहे. राठोड हा गुरूवारी मद्यधुंद अवस्थेत होता. ड्यटी लावण्यावरून व अन्य क्षुल्लक कारणावरून त्याने अधिकारी वर्गाशी हुज्जत घातली. अर्व्वाच्च भाषेत वर्तन केले. राठोड याला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याची ऐकण्याची मनस्थिती नव्हती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button