
गणपतीपुळे विकास आराखड्यासाठी आरखडा १०२ कोटीचा निधी मात्र चाळीस कोटीचा प्राप्त
आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर झळकणार्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे या तीर्थक्षेत्र या पर्यटनस्थळाचा कायापालट करण्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करून त्याला पाच वर्षापूर्वीच मंजुरी देण्यात आली. त्यासाठी शासनाकडून प्राप्त ४० कोटींचा निधी जिल्हा प्रशासन स्तरावरून येथे सुरू असलेल्या गणपतीपुळे परिसर सुशोभिकरण, रस्ते व पाणीपुरवठा अशा कामावर खर्चही झालेला आहे. उर्वरित निधीची शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे.गणपतीपुळे येथे दर दिवशी शेकडो पर्यटक भेट देतात.
. पर्यटन हंगामात हा आकडा लाखांवर जात असतो. या ठिकाणी होणारी पर्यटकांची गर्दी व तेथे असणार्या सोयी सुविधांचा विचार केला तर त्यावर मर्यादा येतात. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढणार्या वाहनांच्या संख्येमुळे येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न उभा राहतो. या परिसरात पाण्याचा प्रश्नही निर्माण होतो. या सर्व प्रश्नांचा सर्वंकष विचार करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने बृहत विकास आराखडा तयार करण्यात आला होता.www.konkantoday.com