
हातपाटी वाळूचे धोरण जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार, मंत्री उदय सामंत.
वाळूअभावी अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे हातपाटी वाळूचे धोरण लवकरच जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.शहरातील अनेक विकासकामांच्या भूमिपूजन, लोकार्पण व पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी ते येथे आले असता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्या वाळू उत्खननाला परवानगी नाही, असे असले तरी पंतप्रधान आवास योजनेतून आपल्याला २० लाख घरे बांधायची आहेत. त्यासाठी वाळू आवश्यक आहे.
कारण ती घरे चुना आणि गुळाने होणार नाहीत, याची जाणीव सरकार म्हणून आम्हाला नक्कीच आहे. त्यामुळे हातपाटी वाळूचे धोरण लवकरच जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. हातपाटीऐवजी सक्शन पंपाने वाळू उत्खननाला असलेला विरोध मी समजू शकतो. तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला सरकार म्हणून आमचा अजिबात पाठिंबाही नाही. मात्र असे असले तरी काहीजण अधिकार्यांवर दबाव आणून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अहवाल अधिकार्यांनी मला मंत्री म्हणून दिला आहे. ही बाबही चांगली नाही. त्यामुळे याची चौकशी करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.www.konkantoday.com