
सेमिनार च्या माध्यमातून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विषयी करण्यात आली जनजागृती हर्षा ऑटोज चा उपक्रम
रत्नागिरी मधे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विषयी जनजागृती करण्यासाठी हर्षा ऑटोज तर्फे सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी
१)श्री. बाळ माने (माजी आमदार )
२)श्री. अजितरावं ताम्हणकर साहेब (सहाय्य्क प्रादेशिक परिवाहन अधिकारी , रत्नागिरी जिल्हा )
३)श्री. प्रशांत जाधव साहेब (मोटर वाहन निरीक्षक )
४)श्री. सुशांत पाटील सहाय्य्क (मोटर वाहन निरीक्षक )
उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यात हाय सिक्युरीटी नंबर प्लेट वितरणाची जबाबदारी हर्षा ऑटोजकडे आहे आणि म्हणून जास्तीत जास्त जणांपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लवकरात लवकर पोचण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात केंद्र उभारण्यात येईल असे यावेळी हर्षा ऑटो चे मिलिंद सावंत यांनी सांगितले .
याप्रसंगी ही नंबर प्लेट का महत्वाची आहे हे उपस्थिताना उदाहरणे देऊन समजावले. तसेच १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक गाडी मालकाने वेळेत ही नंबर प्लेट लावावी असे आवाहन केले.

माजी आमदार बाळासाहेब माने यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मागील नितीन जी गडकरी यांची संकल्पना त्यांनी उपस्थिताना सांगितली तसेच रोड सेफ्टी कडे मोटर वाहन विभागाने लक्ष द्यावे असे देखील सुचवले. अंबर हॉल इथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी १० जणांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट चे वितरण करण्यात आले.पेट्रोल डीलर असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री उदय लोध यांनी संगमेश्वर मधील धामणी पेट्रोल पंप इथे यासाठी लागेल, ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले रत्नागिरी शहरातील बहुसंख्य नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.




