
समाज भूषण पुरस्कार प्राप्त सुरेंद्र घुडे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
रत्नागिरी : गुरुवार दिनांक 27.2.2025 मराठी भाषादिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ कवि वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त लोकमान्य टिळक ग्रंथालयात मराठी भाषादिनी सन्माननीय कवि वि.वा. शिरवाडकर याना म.शा.समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्री. सुरेंद्र घुडे यांच्या हस्ते फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित स.ग्रंथालय प्रमुख श्री. सय्यद व सौ.स्वाती मयेकर समवेत शेकडोंच्या संख्येने महाविद्यालय विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. सुरेन्द्र घुडे यानी आपले विचार व्यक्त करताना मराठी भाषेचा प्रचार व प्रसार जगभरात होण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करूया, असे आवाहन करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. श्री. सय्यद साहेबांनी सर्वांना धन्यवाद देवून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.