
शुद्ध दुधाच्या नावाखाली रत्नागिरीकर पीत होते भेसळयुक्त दूध
रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात दूध संकलन आणि वितरण यावर होणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन अन्न औषध प्रशासनाकडून या व्यवसायावर करडी नजर ठेवण्यात आली होती. अखेर मारूती मंदिर, परटवणे आदीसह अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळी येणारे दूध आणि होणारे वितरण याचे व्हिडीओ रेकॉडींग करत दूधामध्ये भेसळ करणाऱ्यांच्या रंगेहात पकडले ही दूध भेसळ प्रत्यक्ष होत असताना रत्नागिरी जिल्ह्याचे अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी संबंधितांना रंगेहात पकडले रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्रातून दूध येते मात्र अनेक जण गावातील दूध विकत घेण्याबाबत आग्रही असतातरत्नागिरी शहरात हजारो लीटर म्हैशीचे दूध ग्रामीण भागातून येते आणि त्याचे वितरण केले जाते असा आभास याठिकाणी गेले पाच ते सहा वर्षे निर्माण केला जात होता.
महाराष्ट्रातून दूध भेसळीवर महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊले उचलत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व अन्न औषध प्रशासनाला दिले होते. गेले अनेक वर्षे ग्रामीण भागातून रत्नागिरी शहरात ८ ते १० जणांचे टोळके सकाळी दूधाच्या किटल्या घेऊन संबंधित ठिकाणी येऊन एखाद्या टपरीवर किंवा झाडाच्या बाजूला घाटमाथ्यावरून येणारे गायीचे दूध घेऊन त्यामध्ये भेसळ करून शहरातील नागरिकांना म्हैशीचे दूध म्हणून वितरीत करत होते. तर काही ठिकाणी दुधात पाणी मिसळण्याचे हे प्रकार घडत होते एखाद्या गाडीला २०-२० लीटरच्या चार-चार किटल्या बांधून ते शहरात गावठी दूध म्हणून वितरित करण्यात येत होते. याबाबत काही नागरिकांकडून तक्रारी आल्यावर यामध्ये लक्ष घालण्यात आले