
राज्यस्तरिय महसूल स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावून कोकण विभागाने बाजी मारली.
नांदेड येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय महसूल सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेत कोकण विभागाने सर्वाधिक ३४१ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले. दुसरा क्रमांक यजमान छत्रपती संभाजीनगर यांना प्राप्त झघला तर पुणे विबागाला तिसरा क्रमांक मिळाला.विजेत्या कोकण विभागाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नांदेड पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. दरवर्षी ही स्पर्धा घेण्याचे व त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची महसूलमंत्र्यांनी घोषणा केली.
दोन हजारावर अधिकारी-कर्मचारी क्रीडापटूंचा तीन दिवसांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव नांदेड येथे थाटात झाला. वैयक्तिक सांघिक आणि मिश्र अशा विविध क्रीडा प्रकारामध्ये नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर पुणे, नाशिक, कोकण तसेच नोंदणी मुद्रांक व भूमी अभिलेख विभाग अशा एकूण सात विभागांमध्ये ८३ क्रीडा प्रकारात लढती झाल्या. डोळ्याचे पारणे फेडणारे रंगमंच आणि अतिशय व्यावसायिकतेने सादर केलेली प्रत्येक कलाकृती यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी ठरला.www.konkantoday.com