
देवरहाटी जमिन तत्काळ देवस्थानच्या नावे करा, अन्यथा जनआंदोलन छेडणार.
रत्नागिरीतील अनेक देवरहाटी व गावरहाटीच्या जमिनी शासनाने परस्पर ताब्यात घेतल्या आहेत. या सर्व जमिनी तत्काळ देवस्थानांच्या नावे न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा मंदिर महासंघाच्यावतीने चिपळूण येथे आयोजित महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हा अधिवेशनामध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे.
चिपळूण शहरातील स्वामी मंगल कार्यलय सभागृहात सोमवारी महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी जिल्हाभरातून ४५० विश्वस्त व प्रतिनिधी उपस्थित होते.www.konkantoday.com