
उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा दौरा
रत्नागिरी, दि. 28 : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
*शनिवार ०१ मार्च २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता कवलापूर हेलिपॅड, ता. मिरज, जि. सांगली येथून हेलिकॉप्टरने पाली, ता.जि. रत्नागिरी कडे प्रयाण.
सायंकाळी ४.०० वाजता हेलिकॉप्टरने पाली हेलिपॅड ता.जि. रत्नागिरी येथे आगमन व मोटारीने हातखंबा कडे प्रयाण.
सायंकाळी ४.३० वाजता श्री स्वामी समर्थ पेट्रोलियम, हातखंबा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : सिध्दगिरी मंगल कार्यालयाजवळ, हातखंबा, जि. रत्नागिरी).
सायंकाळी ५.०० वाजता “पुढारी आयकॉन” गौरव सन्मान सोहळा-२०२५ कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : देसाई बँक्वेट हॉल, हॉटेल विवेक, माळनाका, रत्नागिरी).
सायंकाळी ६.०० वाजता श्री हनुमान भक्त सेवा मंडळ (फणसवळे) आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी).
सायंकाळी ७.०० वाजता कुरतडे डुगवे लोटेश्वर मंदिर भक्तीनिवास बांधकाम भूमीपूजन कार्यक्रम. (स्थळ : कुरतडे डुगवे, ता.जि.रत्नागिरी).
सायंकाळी ७.३० वाजता कुरतडे डुगवे ग्रामस्थ पक्ष प्रवेश (स्थळ : कुरतडे डुगवे, ता.जि.रत्नागिरी).
रात्रौ ८.०० वाजता हरचेरी भैरी मंदिर येथे भेट व दर्शन (स्थळ : भैरी मंदिर, हरचेरी, ता.जि.रत्नागिरी). रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथे आगमन व राखीव.