
“असे राजकारणी असणं भारतासाठी…” आदित्य ठाकरेंचं नाव घेत स्वरा भास्करचं ट्विट, म्हणाली…
बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय मुद्दा अभिनेत्री स्वरा भास्कर याबाबत खुलेपणाने बोलताना दिसते. तिची काही वादग्रस्त विधानं चर्चेचा विषय ठरत असतातच. स्वरा सोशल मीडियावर नेहमीच तिचं मत परखडपणे मांडत असते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. काही दिवसांपूर्वी स्वरा भास्करने ‘छावा’ सिनेमाबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठलेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर ती पुन्हा एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं होतं. आता स्वरानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
स्वरा भास्करने यावेळी वादग्रस्त विधान नाही तर तिनं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी नुकतंच एका ठिकाणी मुलाखत दिली होती. ही मुलाखत पाहिल्यानंतर स्वरा भास्करने ट्विट शेअर केलं आहे. तिनं लिहलं, “आदित्य ठाकरे हे खूप प्रभावी आणि स्पष्टक्ते आहेत. असे राजकारणी असणं भारतासाठी खूप चागलं आहे”, या शब्दात तिनं कौतुक केलं आहे.