
राज्यभरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
राज्यभरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येत आहे. लसीकरणासाठी सुमारे ६० लाख मुले पात्र असून पहिल्या दिवशी ६५० लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.केंद्राच्या आदेशानुसार ३ जानेवारीपासून राज्यभरात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. २००७ साली किंवा त्याआधी जन्माला आलेली मुले या लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. ‘कोविन’मध्ये ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असून मुलांना थेट लसीकरण केंद्रावरही लस घेण्याची सुविधा असणार आहे. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
www.konkantoday.com