
अलिबागजवळ बोटीला भीषण आग
*पहा व्हिडिओ.
मुंबईजवळच्या अलिबागमध्ये समुद्रातील एका बोटीला भीषण आग लागल्याचं समोर आले आहे. या बोटीमध्ये १८-२० प्रवासी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिमार बोटीला १० वाजेदरम्यान भीषण आग लागली आहे.भर समुद्रात बोटीने पेट घेतला.
आज सकाळी ही घटना घडली. आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली. बोटीच्या वरील जाळी देखील जळाली आहे. बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती मिळत आहे. बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत. साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची बोट आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली आग विजविण्यात आली.