रत्नागिरी जिल्ह्यात मधुमेह,कर्करोग व रक्तदाब तपासणी करीता विशेष मोहिम

असांसार्गिक आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ३० वर्षावरील सर्व व्यक्तीची मधुमेह, उच्चरक्तदाब व कर्करोग (मुख, स्तन व गर्भाशय मुख कर्करोग) बाबत तपासणी मोहीम दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्हयामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य संस्थामध्ये (आयुष्यमान आरोग्य मंदिर, शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र, हिंदुहृदय सम्राट बाळसाहेब ठाकरे आपला दवाखाना, प्राथामिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय , महिला रुग्णालय, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय) यासारख्या आरोग्य संस्थामध्ये येणा-या 30 वर्षावरील व्यक्तींची तपासणी होत आहे. तसेच या मोहिमेतंर्गत असंसर्गजन्य रोगाविषयी जनजागृती करणेकरीता आरोग्यसेविका व आशा मार्फत सर्वेक्षण व तपासणी केली जात आहे. मोहिमे अंतर्गत कर्मचा-यांना तपासणी व निदान करण्याकरीता लागणा-या साधनसामुग्री, बीपी मॉनिटर, ग्लुकोमीटर, औषधे व इतर आवश्यक वस्तुची उपलब्धता करुन देण्यात आलेली आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना मोहिमे बाबत सर्व जबाबदाऱ्या व सूचना देण्यात आलेल्या आहेत.

३० वर्षावरील व्यक्तींना मधुमेह, उच्चरक्तदाब व कर्करोग (मुख, स्तन व गर्भाशय मुख कर्करोग) या सारखे असांसर्गिक आजार होण्याची जास्त शक्यता असते. तरी सदर मोहिमेअंतर्गत ३० वर्षावरील सर्व (पुरुष व महिला )व्यक्तींनी जवळच्या शासकीय संस्थेत जाऊन तपासणी करून घ्यावी व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button