महिन्याला 1500 रुपये देऊन तुम्ही गुंडांना महिलांचे वस्त्रहरण करण्याचा परवाना दिला का? संजय राऊत संतापले

पुण्याच्या हद्दीत जास्त अपहरणाच्या घटना घडतायत. महिलांवर खुलेपणाने अत्याचार, छेडछाडी घटना घडतायत. कोण आहेत पालकमंत्री, कोण आहेत पोलीस आयुक्त? यांना पोलिसांनी जाब विचारला पाहिजे. पुण्यात राजकीय गुंडगिरी सुरु आहे.सत्ताधारी पक्षातील गुंडांना खुलेपणाने अभय असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणावर आपली संपप्त प्रतिक्रिया दिली.

स्वारगेट बसमधील प्रकार हा दिल्लीच्या निर्भया घटनेप्रमाणे आहे. सुदैवाने या घटनेत तरुणीचा जीव वाचला, असल्याचे राऊत म्हणाले.महिन्याला 1500 रुपये देऊन तुम्ही गुंडांना महिलांचे वस्त्रहरण करण्याचा परवाना दिला का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच स्वारगेटला आमच्या शिवसैनिकांनी आंदोलन केले. ज्यात आमचे वसंत मोरे होते. पण त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

विरोधकांना त्रास देण्यासाठी गृहखातं वापरता. ते लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरा, असे राऊत बोलतना म्हणाले.अ‍ॅक्शन मोड हे वरवरची कारणे असतात. बलात्कार झाल्यावर अॅक्शन मोडमध्ये येता का? असा प्रश्न राऊतांनी गृहमंत्र्यांना केला आहे. एकही मंत्री सरकारी गाड्यांतून फिरत नाही. सगळ्यांकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीजमधून फिरतात. या गाड्या तुम्हाला कोणी दिल्या. सामान्य जनता एसटी, शिवशाहीतून फिरते. यांचे संरक्षण कोण करणार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button