
रत्नागिरी शहर परिसरात आता
अॅन्टीजेन तपासणीसाठी दोन ‘मोबाईल व्हॅन’
कोरोना चा वाढता प्रसार रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे
लवकर निदान, लवकर उपचार या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत कोरोना तपासणी उपक्रम राबविला जात आहे आहे. यामध्ये मोफत अॅन्टीजेन तपासणीसाठी दोन ‘मोबाईल व्हॅन’ रत्नागिरी शहर आणि परिसरात तैनात केल्या आहेत. गर्दी आणि हॉटझोनमध्ये अॅण्टीजेन तपासण्या करण्यात येणार आहेत. ही पथके कोरोना सदृश्य लक्षणे असणार्यांची तपासणी करणार आहेत. शहर आणि परिसरातील कोरोना हॉटझोनमधील गर्दीची ठिकाणे निवडून आरोग्य विभागाची पथके तेथील स्वयंस्फुर्तीने आलेल्या लोकांची तपासणी करणार आहे
www.konkantoday.com