
चिपळुणातील बहाद्दूरशेख नाका येथील उड्डाण पुलाचे गर्डर चढविण्याचे काम अखेर सुरू.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेख नाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला आता गती येवू लागली आहे. जुने पिलर तोडल्यानंतर आता नवीन पिलर कॅप उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तीन टीम कार्यरत झाल्या आहेत. तसेच पुलाच्या एका बाजूने गर्डर चढविण्याचे काम गुरूवारपासून सुरू केले आहे.
दोन क्रेनच्या सहाय्याने हे काम केले जात असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आर. बी. कुलकर्णी यांनी दिली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटर दरम्यान, चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहाद्दूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.www.konkantoday.com