
चिपळुणातील पवन तलाव मैदानाला स्व. पी. के. सावंत यांचे नाव द्यावे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश उर्फ बाबू काणे यांची मागणी.
आमदार शेखर निकम यांनी पवन तलाव मैदान विकसित होण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी क्रीडांगणाच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी दिल्याने शहरात दर्जेदार मैदानाची निर्मिती होत आहे. चिपळूणच्या विकासात पूर्वी महत्वपूर्ण योगदान दिलेले चिपळूणचे माजी आमदार, माजी मंत्री स्व. पी. के. सावंत यांचे नाव पवन तलाव मैदानास द्यावे, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश उर्फ बाबू काणे यांनी नगर पालिका प्रशासन तसेच आमदार शेखर निकम यांच्याकडे केली आहे.www.konkantoday.com