
खेड शहरातील धोकादायक बांधकामे असणार्यांना खेड नगर परिषदेकडून ७३ जणांना नोटीस
खेड शहरातील महाडनाका येथील धोकादायक स्थितीतील रिकाम्या खासगी चाळीचा काही भाग मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळल्यानंतर धोकादायक बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरप्रशासनाने यापूर्वीच शहरातील धोकादायक बांधकाम असणार्यांना ७३ जणांना नोटीस बजावल्या आहेत. नगरप्रशासनाची रितसर परवानगी घेवून धोकादायक ठिकाणांचे बांधकाम करण्याचे निर्देश देखील दिल्याचे नगर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com