
वृद्ध कलाकार मानधन प्रस्ताव मर्यादा वाढवा, नमन लोककला संस्थेची मागणी.
राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन योजनेसाठी दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून वेगवेगळ्या कला प्रकारातून अनेक प्रस्ताव येतात. त्यातील काहीच प्रस्ताव मंजूर होतात. त्यामुळे नमन लोककला मंडळ रत्नागिरी संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील शंभर प्रस्तावांची मर्यादा पाचशेपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली.
नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संस्थेच्यावतीने सावर्डे येथे नुकतीच आमदार शेखर निकम यांची संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि सर्व पदाधिकार्यांची भेट घेतली. कलावंतांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी निवेदन सादर केले. नमन लोककलेच्या संवर्धनासाठी काही मागण्या त्यांच्यामार्फत शासनाकडे पोहोचवण्याकरिता हे निवेदन देण्यात आले.www.konkantoday.com