
राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मराठी बोलूनच राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक परदेशामधून आणली-उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत.
भाषेतील लोप पावत चाललेले शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, लोकगीते यांचे पुस्तक प्रकाशन सोहळा व चिपळूण नगर परिषद व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या सहयोगाने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या आत्मार्पण दिना निमित्त २ अंकी नाटक सागर प्राण तळमळला या कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून संबोधित केल.यावेळी चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली. तसेच उद्योगमंत्री म्हणून चिपळूणच्या विकासात योगदान देण्याचे काम यापुढे अविरत चालू राहिल असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सर्वांना दिला.

राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मराठी बोलूनच राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक परदेशामधून आणली हे ठामपणे सांगितल. तसेच मराठीचा आग्रह हा सर्वांनीच धरावा असे आवाहन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले.यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी चिपळूणच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाबद्दल त्यांचे कौतुक केले. हे प्रेरणादायी पुस्तक आहे आणि हा राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना आदर्श निर्माण केला आहे.यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच चिपळूणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
