
भंगार व्यावसायिकांचे एसटीच्या अधिकार्यांसोबत जागेच्या भाड्यावरून शाब्दिक वाद.
एसटीच्या विभागीय कार्यशाळा आवारातील भंगार लिलावात राज्यातील तब्बल २४ भंगार व्यावसायिकांनी भाग घेतला. भंगाराचा लिलाव झाल्यानंतर तो तातडीने उचलून नेला जावा, यासाठी प्रतिदिन २० हजारांचे जागा भाडे आकारण्यात आले. त्यामुळे लिलाव घेणार्या काही भंगार व्यावसायिकांचे एसटीच्या अधिकार्यांसोबत शाब्दिक वाद झाले.एमआयडीसीतील एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील ४ कोटी रुपयांच्या भंगाराचा लिलाव झघला.
या लिलावात मुंबई, पुणे, कोल्हापूर, जालना, सातारा, सांगली, हैद्राबाद येथील भंगार व्यावसायिकांनी भाग घेतला. ज्यांना लिलाव मिळाला त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या वजनाचे भंगार दुसर्या दिवसापासून ट्रकने विभागीय कार्यशाळेच्या आवारातून न्यायचे होते. ज्या व्यावसायिकांनी भंगार उचलण्यास विलंब केला, त्यांना भंगार ठेवलेल्या जागेचे प्रतिदिन २० हजार रुपये इतके भाडे मोजावे लागले. सकाळी ८ ते सायं. ४ वाजेपर्यंत आवारातून भंगार नेण्याची मुभा होती.www.konkantoday.com