
चिपळूण नगर पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर अतिक्रमणांवर पडणार हातोडा.
चिपळूण शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात नगर पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तदेखील मागविला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच अतिक्रमणांवर हातोडा पडणार असून त्यामुळे शहर पुन्हा एकदा मोकळा श्वास घेणार आहे.
चिपळूण शहरातील बाजारपेठेसह मुख्य व अंतर्गत रस्ते, गटारांवर अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी बस्तान बांधत अतिक्रमण केले आहे. अनेकांनी व्यवसायासाठी तात्पुरती व्यवस्था, तर काहींनी पक्के बांधकाम केले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा ही अतिक्रमणे वाढत चालली आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय पादचार्यांना चालणे सुद्धा अवघड बनल आहे. या परिस्थितीमुळे शहरात वाहतूक कोंडीसह छोटे मोठे अपघात होत आहेत.www.konkantoday.com