
शासकीय रुग्णालयातील औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई होणार ?
काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी आठवडा बाजार येथे शासकीय रुग्णालयातील औषधाचा साठा एका टेम्पोत पकडण्यात आला होता औषध साठा शासकीय रुग्णालयात न जाता परस्पर दुसरीकडे जात असताना याची खबर मिळाल्यानंतर हा साठा पकडण्यात आला होता कोल्हापूरहून केलेल्या औषध खरेदी प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. चौकशी अहवालावर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयाच्या औषध विभागावर ठपका ठेवला असून, आपल्या स्तरावर त्याचा निपटारा करावा, असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना दिल्याचे समजते. यात औषध विभागाचे काही अधिकारी, कर्मचारी दोषी असून, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे कळते
www.konkantoday.com