
खेड तालुक्यातील सोनगावनजिक रेल्वेतून पडून झारखंड येथील तरूणाचा मृत्यू.
खेड तालुक्यातील सोनगाव-भोईवाडा रेल्वे बोगद्यानजिकच्या रेल्वे रूळानजिक ४१ वर्षीय तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. नारायण सिंग किसनसिंग (रा. सोडे-झारखंड) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो सहकारी श्रीभुवन सिंग यांच्यासमवेत मडगांव ते मुंबई असा रेल्वेतून प्रवास करत असताना तोल जावून खाली पडून मृत्यू झाला. या बाबात पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com