
कोकणातील ११ पर्यटनस्थळांसह उभारणार ४५ रोप-वे, मंत्रिंमडळाची मान्यता.
राज्यातील अनेक पर्यटन ठिकाणांना दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे आबालवृद्धांना भेट देणे कठीण होते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने या ठिकाणांवर केंद्र सरकारच्या साथीने राज्यात ४५ रोप-वे उभारण्यास मान्यता दिली आहे. या रोपवेमधील कोकण विभागात ११ तर पुणे विभागात १९ रोप-वे उभारण्यात येतील. राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टीक व्यवस्थापन लि. यांच्याबरोबरीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे.केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टीक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल) आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजनेअंतर्गत एकूण ४५ रोप-वेची कामे हाती घेण्यात आली आहेत.
हाजिमलंग, कल्याण फनिक्यूलर ट्रॉली सार्वजनिक बांधकाम विभाग (पीपीपी), रेणुकामाता मंदिर माहुरगड, नांदेड सा. बां. विभाग (सीआरआयएफ) प्रगतीपथावर, सिंहगड रोप-वे खासगी विकासक, जेजुरी रोप-वे खाजगी विकासक, प्रस्तावित प्रकल्प कोकण विभाग, रायगड किल्ला सा. बां. विभाग माथेरान एमएमआरडीए, कणकेश्वर, अलिबाग जिल्हा परिषद, रायगड बाणकोट किल्ला, मंडणगड एनएचएलएमएल, केशवराज (विष्णू) मंदिर, दापोली एनएचएलएमएल, महादेवगड पॉईंट, सावंतवाडी एनएचएलएमएल सनसेट पॉईंट, जव्हार एनएचएलएमएल, गोवा किल्ला, दापोली एनएचएलएमएल, अलिबाग चौपाटी ते किल्ला नगर परिषद, अलिबाग घारापुरी, एलिफंटा लेणी जिल्हा परिषद रायगड.www.konkantoday.com