
नगर परिषदेच्या कारभारामुळे कचरा प्रकल्पातून कचरा जाळल्याने धूर व प्रदूषण, नागरिक आंदोलनाच्या तयारीत
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृतपणे कचरा जाळला जात आहे. यामुळे लगतच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा न पेक्षा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवाद कॉंग्रेस पार्टीतर्फे नगर परिषद प्रशासनाला देण्यात आला आहे.यासंदर्भात न.प.चे मुख्याधिकारी तुषार यांना भेटून निवेदन देण्यात आले. हे निवेदन देतेवेळी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते बशीर मुर्तुझा आणि युवक जिल्हाध्यक्ष नौसिन काझी व त्यांच्या सहकार्यांनी जळीत कचर्याच्या धुरापासून रत्नागिरी शहरातील नागरिकांची मुक्तता करावी, अशी मागणी केली आहे.
साळवी स्टॉप येथे गेल्या गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृतपणे जाळण्यात येणार्या कचर्यामुळे लगत राहणार्या कोकणनगर, स्टेट बँक कॉलनी, क्रांतीनगर, साळवी स्टॉप, शिवाजीनगर, चर्मालय आदी भागातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब खूपच गंभीर असतानाही रत्नागिरी नगर परिषद मात्र त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बशीर मुर्तुझा, युवा नेते सईद पावसकर, सनीफ गवाणकर आदींनी पुढे येत त्यांनी जनहिताची मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेतली.www.konkantoday.com