
रत्नाागिरी नगर राजभाषा कार्यान्वमयन समिती व बँक ऑफ इंडिया, आंचलिक कार्यालयला राजभाषेचा सर्वोच्च क्षेत्रीय पुरस्कार
रत्नागिरी, दि. 24 : हिंदीचा प्रचार-प्रसार कार्य करणाऱ्या संस्थांना भारत सरकार, राजभाषा विभागद्वारा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्काुर नगर राजभाषा समिती व बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाला घोषित करण्यात आला होता. त्याचे वितरण जयपूर येथे पुरस्कार समिती अध्यक्ष व बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख नरेंद्र रघुनाथ देवरे तथा सदस्य सचिव रमेश गायकवाड यांना राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल जी तथा गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते करण्यात आले.
नगर राजभाषा कार्यान्वयन समिती व बँक ऑफ इंडियाने विविध क्षेत्रात केंद्र सरकारचे हिंदी चे प्रचार प्रसाराचे काम केले व त्या बरोबर शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. समितीचे स्वतंत्र कार्यालय त्याचबरोबर हिंदी, मराठी पुस्तकांचे ग्रंथालय बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालयाने सर्व कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध करून दिली आहे. समितीच्या संयोजनाचे कार्य बँक ऑफ इंडियाच्या, विभागीय कार्यालयाला सोपवलेले आहे.
हा पुरस्कावर रत्नागिरी शहरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालय, विमा कंपनी तथा बँकांच्या कार्यालयांनी केलेल्या हिंदीच्या कार्याचा गौरव असल्याचे समितीचे अध्यक्ष श्री देवरे यांनी सांगितले. मराठी भाषेला संपर्क भाषा हिंदी ची जोड देवून ग्राहक आधार वाढवून व्यवसायवृध्दी करावी व कोणत्याही योजनेची माहिती जनतेला दिली जाईल. ती ग्राहकांच्या भाषेत दिली जाईल. याकडे लक्ष द्यावे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. समितीची अर्धवार्षिक हिंदी पत्रिका राजभाषा रत्नसिंधू पत्रिका प्रेरणाचे प्रकाशन केले जाते. तसेच समितीची स्वत: ची वेबसाइटही कार्यरत आहे. समितीच्या संयोजनाचे कार्य ही बँक ऑफ इंडिया मोठ्या जबाबदारीने पार पाडीत आहे. समितीमध्ये 30 सदस्य कार्यालय आहेत. बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयमध्ये ही आंतरिक कामाकाजामध्ये हिंदी चा उत्कृष्ट प्रयोग केला जातो.
प्रत्येक तिमाहीमध्येय ई पत्रिकास्टार स्नेयह प्रकाशित केली जाते. विभागीय कार्यालयाच्याअंतर्गत येणारे 93 शाखांमध्ये ही क्षेत्रीय भाषा मराठी बरोबरच हिंदी चा प्रयोग केला जातो. या कार्याची नोंद घेवून केंद्र सरकारने पुरस्कार प्रदान केला. समितीला व विभागीय कार्यालयाला असे दोन पुरस्कार प्राप्त करून एक नवीन विशेषतः प्राप्त केली आहे. समितीचे सदस्य सचिव व बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक, राजभाषा म्हणून श्री गायकवाड कार्य पहात आहेत.