
मुंबई गोवामहामार्गावर ओसरगाव येथे एका महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला
मुंबई गोवामहामार्गावर ओसरगाव येथे एका महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे.
सोमवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. दरम्यान हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच मृतदेह बाहेरून आणून येथे जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ओसरगाव येथे एमव्हिडी कॉलेज पासून काही अंतरावर महामार्गापासून सुमारे 100 मीटरवर एकाच ठिकाणी आग दिसून आली. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता बहुतांशी मृतदेह जळालेला होता. मात्र हा मृतदेह कोणाचा आहे हे कळू शकलेले नाही मृतदेहाचे काही भाग जळलेले नाहीत त्यामुळे कदाचित मृतदेह बाहेरून आणून येथे जाळण्यात आला असावा असा अंदाज आहे