
भाड्याच्या गाड्यांची फसवणूक करत रत्नागिरीत केली विक्री, दोन आरोपींना अटक.
चारचाकी गाड्या भाड्याने लावतो असे सांगून विक्री करणार्या खेड तालुक्यातील कुंदन यादव (२३, सध्या रा. वडगा बुद्रूक, नवले पुलाजवळ) यांच्यासह दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली तर त्यांनी यातील काही कार रत्नागिरी जिल्ह्यात विक्री केल्या आहेत. त्यातील १६ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तब्बल १ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.आरोपींनी भाड्याने देण्यासाठी गाडी विकत घ्या आम्ही तुम्हाला पैसे मिळवून देतो, अशी बतावणी करून या गाड्या विक्री करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
गाड्यांची विक्री केल्यानंतर आरोपी यातील काही पैसे गाडीच्या मूळ मालकाला प्रत्येक महिन्याला देत असत. त्यामुळे आपली गाडी पैसे कमावून देतेय, असे वाटत होते. परंतु जेव्हा खरा प्रकार समोर आला तेव्हा अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी भाड्याने लावलेल्या गाड्या दोघा ठगांनी परस्पर विक्री केल्या होत्या. त्या रॅकेटचा पुण खराडी पोलिसांनी पर्दापाश केला असून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ६३ लाखांच्या १६ इर्टिगा गाड्या जप्त केल्या आहेत.कुंदन यादव (२३, रा. वडगा बुद्रूक, नवले पुलाजवळ, मूळ खेड, रत्नागिरी), गिरीष सणस उर्फ संदीप उर्फ़ सौरभ सुनील काकडे (येरवडा) अशी दोघा ठगांची नावे आहेत.www.konkantoday.com