
गणपतीपुळे येथील समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या सांगली येथील चार मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू
गणपतीपुळे येथील समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या सांगली येथील चार मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. बुडालेला तरुण सांगलीचा आहे. तर त्याच्या तिघा मित्रांना बाहेर काढण्यात यश आले आहे. प्रणेश मुकुंद वसगडेकर (23, रा. सांगली) असे मृताचे नाव आहे.
ओमकार उत्तम मेहत्तर (26, रा.कोल्हापूर), वैभव जगताप (25, रा.सांगली) आणि पृथ्वीराज पाटील (24, रा.सांगली) अशी वाचवण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गुरुवारी ते आंघोळ करण्यासाठी गणपती मंदिराजवळील समुद्रात गेले. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने प्रणेश गटांगळ्या खाउ लागल्याने त्याने आणि त्याच्या मित्रांनी आरडा-ओरडा केला. जवळच असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले
www.konkantoday.com