नामदार उदय सामंत आणि आमदार किरण (भैया) सामंत यांच्या सूचनेनुसार निमेश नायर ह्यांनी दणका देत दूर केली नागरिकांची गैरसोय

*HSRP नंबरप्लेट बसाविण्यासाठी नागरिकांना करावा लागत होता गैरसोयीचा सामना

सरकारने सर्व प्रकारच्या वाहनांना HSRP प्रकारची नंबरप्लेट बसविणे सक्तीचे केले असून सदर नंबरप्लेट बसविण्याची अंतिम मुदत मार्च महिन्याअखेर संपणार आहे. त्यामुळे रत्नागिरी मधील नागरिकांची सदर नंबर प्लेट बसविण्यासाठी धावपळ सुरु आहे. लाखोंची लोकसंख्या असलेल्या रत्नागिरीसाठी शासनाने HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी “रियल मेझॉन एम्बॉसिंग सेंटर” नावाची केवळ एक एजन्सी नेमली असून ती एजन्सी देखील कोल्हापूर येथील आहे व त्यांचे ऑफिस शहराबाहेर कुवारबाव नजीक आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी मोठा हेलपाटा पडत आहे. तरी देखील नागरिक सरकारी नियम पाळण्यासाठी HSRP नंबर प्लेट वाहनांना बसविण्यासाठी आगाऊ वेळ घेऊन सदर एजन्सी मध्ये पोहचत आहेत. परंतु ह्या एजन्सी मध्ये कमी कर्मचारी वर्गामुळे आगाऊ वेळ घेऊन आलेल्या नागरिकांना तेथील गैरसोयीमुळे ताटकळत राहावे लागत आहे. तसेच ताटकळत राहिलेल्या नागरिकांना सदर एजन्सी ने ना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे ना बसण्याची सोय केली आहे.

सदर गैरसोयीबद्दल रत्नागिरीतील नागरिकांनी पालकमंत्री ना. उदयजी सामंत व आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांच्याकडे फोनवरून तक्रारी केल्या. त्यानंतर ना. उदयजी सामंत व आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी तात्काळ माजी नगरसेवक निमेश नायर व राहील मुजावर ह्यांना त्याठिकाणी पाठवले. निमेश नायर ह्यांनी “शिवसेना स्टाईल” ने सदर एजन्सी चालविणारे श्री. पटेल ह्यांना दणका दिला.

निमेश नायर ह्यांच्या दणक्यानंतर श्री. पटेल ह्यांनी आपली चुक मान्य करत येत्या दोन दिवसात 10 कर्मचारी रुजू करण्याचे आश्वासन देत नागरिकांना पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था आदी गैरसोयी दूर करण्याचे आश्वासन दिले. निमेश नायर ह्यांच्या दणक्यानंतर नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाल्यामुळे उपस्थित नागरिकांनी ना. उदयजी सामंत, आमदार किरण (भैय्या) सामंत तसेच निमेश नायर, राहील मुजावर ह्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button