
चिपळूण शहरालगत असलेल्या वालोपे गावीमहामार्ग ओलांडणार्या वृद्धाला वालोपेत धडक
चिपळूण शहरालगत असलेल्या वालोपे गावी मुंबई-गोवा महामार्गावर एकवीरा हॉटेलच्या पुढे रस्ता ओलांडणार्या वृद्धाला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने तो जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी घडला. मुंबई- गोवा महामार्गावर एकविरा हॉटेलच्या पुढे महामार्गा ओलांडणार्या शंकर कदम यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला व हाताला खरचटले आहे. त्यांना उपचारासाठी लाईन केअर रूग्णालयात पाठविण्यात आले.www.konkantoday.com