
ठाकरेंच्या घरात जे सँडविच जातं ते ट्रायडेंटमधून, अंतर्वस्त्राचे पैसेही ते स्वतः देत नाही.’, मंत्री नितेश राणे यांची जोरदार टीका
ठाकरेंच्या घरात जे सँडविच जातं ते ट्रायडेंटमधून, अंतर्वस्त्राचे पैसेही ते स्वतः देत नाही अशी जोरदार टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी म्हटले होते यावरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी पलटवार केलाय. संजय राऊतांना नीलम गोऱ्हेंचे वक्तव्य दुखणारच आहे. कारण उद्धव ठाकरे जर मर्सिडिज घेत असतील, तर संजय राऊत मारुती मागतात. त्यामुळे त्यांना झोंबणारचं. मालकाला मर्सिडिज द्या आणि नोकराला मारुती कार द्या, त्यामुळे त्यांना हे झोंबणारचं, असं म्हणत नीलम गोऱ्हे जे काही बोलल्या आहेत, ते योग्य असल्याचे नितेश राणे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, ‘उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले नाहीत. हॉटेलचं बीलही ते देत नाही.
घरातला एसीही व्हिडीओकॉनचा लावला होता. त्यामुळेच राजकुमार धूत यांना खासदारकी दिली होती. बाहेरगावचे तिकीट असो अंतर्वस्त्राचे पैसेही ते स्वत: देत नाही, असे म्हणत नितेश राणेंनी म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.दरम्यान, संजय राऊतांना मला सांगायचं की मालकाचे वस्त्रहरण करायचं असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे आणि माझ्या बाजूला बस, आम्ही तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या गाड्या, कपडे, जेवण कुठून येतो हे सांगतो, असं म्हणत राणेंनी राऊतांना खुलं आव्हान दिलंय. इतकंच नाही तर आताही उद्धव ठाकरेंच्या घराची लाँड्री ही लीला हॉटेलमधून केली जाते. त्यावर यादव हे नाव दिलं जातं. त्याची मी रिसीट दाखवू शकतो. आताही त्यांच्या घरात जे सँडविच जातात ते ट्रायडेंट हॉटेलमधून जातात. त्यामुळे संजय राऊतांना मी सांगेन की मला तोंड उघडायला लावू नका, असं म्हणत राणेंनी जोरदार घणाघात केलाय.