
करुळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू,
गेल्या दीड वर्षांपासून बंद असणारी करुळ घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापुरातून कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटमार्गावर काँक्रिटीकरण, रुंदीकरण आणि संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू होते.
कामात अडथळा येऊ नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा घाट बंद ठेवण्यात आला होता. आता घाटमार्ग एकेरी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून करुळ घाटातून वाहतूक सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार वैभववाडी करूळ घाटातून कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर कोल्हापूरकरडून येणारी वाहतूक ही पूर्वीप्रमाणे भुईबावडा घाटातूनच सुरू राहणार आहे. 15 मार्चनंतर आढावा घेऊन दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.