आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा आलेख चढता ठेवणार….

रत्नागिरी- -आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्यात सक्रिय झाला आहोत, आम्ही नावासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काम न करता ध्येय आणि उद्देश याप्रमाणे काम करून सामाजिक कार्याचा आलेख चढता ठेवणार असा विश्वास आदर्श माता प्रतिष्ठानचे महाराष्ट्र कार्यकारी सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे उपाध्यक्ष असलम शेख यांनी व्यक्त केला.

आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच महाराष्ट्र राज्य रक्तदान शिबिर आणि रुग्ण तपासणी शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना तसेच उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना असलम शेख म्हणाले, आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या दूरदृष्टी ठेऊन करीत असलेल्या सामाजिक कार्याचा आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी अभ्यासपूर्ण देत असलेल्या लढ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामाजिक काम करीत असून संघटन बांधणी ही आमची सुरू आहे.

आज जिल्हा रुग्णालयात केलेल्या रक्तदान शिबिरा दरम्यान जवळपास दोनशे रक्तदात्यांनी सहभाग घेतला. असेही अस्लम शेख म्हणाले तसेच यावेळी असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पदाधिकारी निवड ही करण्यात आली यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी निवडण्यात आली.नदीम गूलाम काझी, (जिल्हा अध्यक्ष)निखिल सावंत (तालुका अध्यक्ष) ,फैज अहमद काझी (सेक्रेटरी),एन्थोनी थाॅमस,मेहबूब खतीब,अ‌झर शेख,आझाद कोतव‌डेकर,सत्यवान खा‌डे,मुझाहित निगवेकर,अनिरुद्ध कांबळे यासीन मुकादम यांच्या निवडी करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button