
१३ ते १४ वयोगटातीलं अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरण्याचा प्रयत्न
रत्नागिरी शहरालगतच्या शिरगांव बाणेवाडी येथे अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान ही बाब दुचाकी मालकाच्या लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने या मुलांना ताब्यात घेण्यात आले. तसेच शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या बाणेवाडी येथे दोघे अल्पवयीन मुले दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दुचाकी मालकाच्या लक्षात आले. ही बाब समोर येताच या दोन्ही मुलांना स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पकडण्यात आले. दोन्ही मुले ही १३ ते १४ वयोगटातीलं असल्याची बाब उघड झाली आहे.