
देशात NDA सरकार पुन्हा सत्तेत येणार -राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर
देशात NDA सरकार पुन्हा सत्तेत येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ जून रोजी २०१९ च्या निकालाप्रमाणेच किंवा त्याहून अधिक जागांनी पुन्हा सत्तेत येतील अशी भविष्यवाणी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची मुलाखत विविध वृत्तवाहिन्यांवर घेतली जात आहे. त्यातच एका मुलाखतीत ४ जूनच्या निकालाचं चित्र काय असेल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर पीके यांनीही त्यांचा अंदाज वर्तवला आहे.प्रशांत किशोर म्हणाले की, पूर्व आणि दक्षिणेत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढणार असून त्यांच्या जागाही वाढताना दिसतात. या भागात जागांसोबत मतदानाची टक्केवारी वाढल्यानं भाजपाला दक्षिण पूर्व भागात १५-२० जागांचा फायदा होऊ शकतो. पश्चिम उत्तरमध्येही भाजपाला फारसं काही नुकसान होताना दिसत नाही. भलेही लोकांमध्ये भाजपा सरकारविरोधात नाराजी असेल परंतु व्यापकरित्या मोदी सरकारला हटवण्याबाबत लोकांमध्ये राग दिसत नाही, कारण भाजपाला आव्हान देण्यात विरोधक कमी पडलेत असं त्यांनी सांगितले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.www.konkantoday.com