
वैदिक गणिताचा प्रचार प्रसार हेच माझे ध्येय. प्रा. राजीव सप्रे यांचे प्रतिपादन.
त्रि दिवसीय भारतीय कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न
गणित हा अधिक संशोधन झालेला विषय आहे. जगाच्या पाठीवर भारताचे गणित हे आदर्शवत आहे. याच परंपरेतील वैदिक गणिताचा प्रचार प्रसार करणे हेच माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभागाचे निवृत विभागप्रमुख तथा प्रा राजीव सप्रे यांनी केले.
ते केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने,कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि संस्कृत विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित त्रि दिवसीय भारतीय गणित कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्प देऊन प्रा राजीव सप्रे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविकात बोलताना रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी भारतीय गणित आणि गणिताची कालपरत्वे असणारी उपयोगिता व कार्यशाळेच्या आगामी रूपरेषेबाबत भाष्य केले.यावेळी प्रा सप्रे म्हणाले की, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी अशा विविध क्षेत्रात प्राचीन भारतीय तज्ञांनी संशोधन केले आहे. आजच्या काळात एकीकडे स्पर्धा परीक्षा करिता युवावर्ग तयारी करताना त्यांना याच प्राचीन परंपरेतील वैदिक गणिताची मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे हे गणित प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.यावेळी अध्यक्षीय भाषणात गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) चे प्राचार्य प्रा मकरंद साखळकर म्हणाले की, आपल्या भारतीय गणिताचा प्रभाव हा जगातील सर्व गणितावर आहे.
याच प्राचीन परंपरेने दशमान पद्धत , बीजगणित, शून्याचा शोध हे आविष्कार जे देऊ केले ते आज प्रचलित आहे. त्यामुळे हा वारसा जपण्याचे कर्तव्य प्रत्येकाचे आहे.यावेळी या कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य प्रा मकरंद साखळकर, संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ कल्पना आठल्ये , रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे, उद्घाटक तथा व्याख्याते डॉ राजीव सप्रे, कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, रत्नागिरी व रत्नागिरीच्या आजूबाजूच्या परिसरातून विद्यार्थी , स्थानिक रत्नागिरीकर उपस्थित होते.
*उद्याचे व्याख्यान*
सकाळ सत्र
विषय: The Bhaskaracharya Classroom
व्याख्याते: अन्वेष देवुलपल्लि
वेळ सकाळी ११ ते १२.३०
विषय:भारतीय गणिताचा इतिहास आणि व्यापकता
व्याख्याते:डॉ कृष्ण कुमार पांडेय वेळ दुपारी १२.३० ते १.३०
दुपार सत्र
विषय:Indian Number System
वेळ : २.३० ते ३.३०
विषय: Playfull Mathematics: Selections From Lilavati And Bijaganit
वेळ: ३.३० ते ४.३०
व्याख्याते: डॉ रामकृष्ण पेजात्ताय