
वाळू धोरण होणार कडक; वाळू माफियांची आता खैर नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणणार नवे धोरण.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २४ फेब्रुवारीला राज्याचे वाळू धोरण जाहीर होणार असल्याची माहिती दिली. उमरखेड येथे एका कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रभर वाळू माफियांचा मोठा प्रभाव आहे, ज्यामुळे अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत.त्यामुळे, येत्या काळात वाळू सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी कडक उपाययोजना लागू केली जाणार आहेत, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
वाळू धोरणामध्ये सुधारणा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत वाळूच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कडक केली जाईल. प्रशासन व अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेत प्रशासन कार्यरत राहील. यासाठी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना शस्त्रधारी सुरक्षा कर्मचार्यांचा देखील संरक्षण राहणार आहे मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता न घाबरता कार्य करण्याचा आवाहन केल