
थ्री एम पेपर मिलच्या व्यवस्थापका सह तीन जणावर गुन्हा दाखल
खेर्डी एमआयडीसीतील व्यवस्थापकासह तीनवर गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक अंतर न पाळता परप्रांतातून कामगारांना बसमधून आणल्याप्रकरणी शिरगांव पोलीसांनी ही कारवाई केली.
या कंपनीत कामासाठी ४२ कामगार आणण्यात आले होते. त्यांना आणताना गाडीचा चालक राजू गुप्ता,ठेकेदार रवीसिंग पत्तुलाल आणि या कामगारांना आणावयास सांगणारा व्यवस्थापक हसमुख संगाेई या तिघांवर कलम २६८ व २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
www.konkantoday.com