
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना मालवण मध्ये भारताच्या विरोधात घोषणाबाजी, दोन जण ताब्यात, आज सर्वपक्षीय मोर्चा
काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये दोघांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना भारत विरोधी घोषणा दिल्या.यामुळे तेथील संतप्त नागरिकांनी या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आज या निषेधार्थ मालवणमध्ये संतप्त नागरिकांनी बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली.
काल चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत वि. पाकिस्तानचा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला गेला. दरम्यान हा सामना सुरु असताना मालवणमध्ये दोघा जणांनी भारताच्या विरोधात घोषणाबाजी केल्या. तेथे उपस्थित नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतरही काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिल्या.
मालवणमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान समाजकंटकांनी भारताविरोधी घोषणा दिल्या. भारताची फलंदाजी सुरु असताना ज्यावेळेस रोहित शर्मा बाद झाला, तेव्हा या समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केली. यावरुन मालवणमध्ये आज संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणाच्या विरोधात सर्वपक्षीय बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीच्या वेळी पोलिसांना निवेदनही देण्यात आले.